Angadukhi article in Marathi. नमस्कार मित्रांनो मी डॉ. बाबासाहेब रेणुशे, आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला अंगदुखी का होते? तिची कारण काय आहेत आणि ती होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी याविषयी थोडं मार्गदर्शन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला ज्याचं नाव आहे अंगदुखी.
आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाला कोणालातरी अंगदुखीची समस्या रोज पाहायला मिळते.
ऋतू कोणताही असू द्या अंगदुखीची समस्या ही आजकाल कायमची झालेली आहे.
आपणाला त्यासाठी माहित हवं की नेमकी अंगदुखी कशामुळे होते व आपण काय काळजी घेतली पाहिजे.
Angadukhi article in Marathi
अंगदुखीची कारणं
अंगदुखीमागे केवळ दुखापत हे एकच कारण असू शकत नाही. तर अंगदुखीमागे वेगवेगळी कारणं असू शकतात. जाणून घेऊया अंग दुखीची कारणं-
| Epsom Bath Salt For Muscle Relief Best Epsom Bath Salt For Muscle Relief --> Check Price |
व्हिटॅमिन D ची कमतरता
व्हिटॅमिन शरीरासाठी फारच गरजेचे असते. जर त्याची कमतरता झाली की, शरीर काही संकेत देऊ लागते. व्हिटॅमिन D ची कमतरता शरीरात असेल तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास जाणवू शकतो. जर तुम्हाला अचानक असा अंग दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या शरीरात व्हिटॅमिनD ची कमतरता झाली आहे की नाही हे तपासावे.
लोहची कमतरता
शरीरात सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. जर शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असेल तर शरीर बळकट राहते. स्नायू आणि हाडांना चांगलीच बळकटी मिळते. जर तुम्ही लोहाचे प्रमाण योग्य नसेल तरी देखील तुम्हाला अंग दुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोहाची कमतरता हे देखील या मागे एक कारण ठरु शकतो.
ताण तणाव
हल्लीच्या काळी ताण-तणावाने सगळ्यांना ग्रासलेले आहे. ज्यांना सतत काही तरी टेन्शन असते अशांना अनेक शारीरिक व्याधी अगदी हमखास जाणवतात. त्यामुळे तुमच्या अंगदुखीमागे हे एक कारण देखील अगदी नक्कीच असू शकते. तुम्हीही कोणत्या गोष्टीचा ताण घेतला असेल तर तुम्हाला अपुरी झोप, अपुरा आहार असे काही त्रास होतात. त्यामुळे अंग दुखीचे हे एक कारण ठरु शकते.
डिहायड्रेशन
पाणी कमी पिण्याची सवय ही तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. जर तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी प्यायला नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. शरीराराची योग्य हालचाल होण्यासाठी तुम्हाला शरीरात योग्य पाणी असणे गरजेचे असते. जर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी असायला हवे. त्यामुळे पाणी हे शरीरासाठी फारच गरजेचे आहे.
झोपेची कमतरता
शरीर रिलॅक्स करण्यासाठी आरामाची गरज असते. जर तुम्ही योग्य आराम केला तर तुम्हाला थकवा किंवा शरीराला आलेले जडत्व जाणवणार नाही. झोप ही प्रत्येक शरीराची गरज आहे. शरीराला आलेला क्षीण घालवण्याचे काम झोप करते. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला अंग दुखीचा हा त्रास जाणवणे अगदी स्वाभाविक आहे. संपूर्ण शरीराचा थकवा हा 8 ते 9 तासांच्या झोपेमुळे पूर्ण होतो. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास मुळीच होऊ शकत नाही.
थकवा
खूप काम केल्यावर किंवा सहनशक्तीपेक्षा जास्त स्ट्रेस घेतल्यामुळेही खूप वेळा आपल्याला थकवा जाणवू लागतो. जर तुमचे शरीरा व्यायामामुळे किंवा कोणत्याही अती कामामुळे सतत थकत असेल तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणे हे अगदी स्वाभाविक आहे. जर तुम्हाला असा थकवा जाणवत असेल तर तुम्ही त्याची योग्य काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणार नाही.
ताप किंवा सर्दी
कोणतेही आजारपण हे शरीरात थकवा आणत असते. ताप आणि सर्दी झाली की, शरीराच्या सगळ्या क्रिया या मंदावतात. अशावेळी शरीरामध्ये कणकण असते ही कणकण जर तशीच राहिली त्याकडे दुर्लक्ष केले तरी शरीरामध्ये कमालीचा थकवा येतो. ज्यामुळे अंग दुखीचा त्रास होऊ लागतो. कधी कधी तापातून बरे झाल्यानंतरही काही दिवस हा थकवा जाणवतो. त्यामुळे याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. 'Angadukhi article in Marathi'
आर्थरायटीस
हाडांशी निगडीत असलेल्या अशा या आजाराने अनेक जण त्रस्त असतात. हा त्रास मांड्या आणि गुडघ्यांन होतो. हा एक संधीवाताचा एक प्रकार असून त्यामुळे अंग दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास असेल तरी देखील अंग दुखीचा त्रास तुम्हाला अगदी हमखास होण्याची शक्यता असते.
न्युमोनिया
आजारपण हे शरीरात थकवा आणतात. न्युमोनियासारखा आजार हा शरीरामध्ये थकवा आणण्याचे काम करतो. अशावेळी देखील जरा शारीरिक हालचाल केली की त्रास होतो. अंग अगदी मुरडून जाते. काहीही काम करण्याची इच्छा राहात नाही. जर तुम्हाला न्युमोनिया झाला असेल तर तुम्हाला हमखास अंगदुखी, थकवा असा त्रास होण्याची शक्यता असते. याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. कारण ही अंग दुखी भयंकर वाढून तुमच्यामधील प्रतिकारशक्ती कमी करुन टाकते.
सांधेदुखी
खूप जणांना सांधे दुखीचा त्रास असतो. सांधेदुखीमागेही अनेक कारणं असू शकतात. पण त्यामुळेही अंग दुखू शकते. स्नायूंनाही त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. सांधे दुखीचा त्रास हा आता केवळ ज्येष्ठांनाच होतो असे नाही तर आता तरुणांमध्येही हा त्रास दिसू लागला आहे.
Angadukhi in Marathi
article in Marathi
तुम्हाला पडलेत का प्रश्नमाहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा
आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
ओ.पी.डी वेळ :
प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी ,
सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.
Blog
https://drbabasahebrenushe.blogspot.com/
Quora
https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/
व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts
https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1
Google - https://g.co/kgs/GcvzaB
https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2
Linktree -
https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe
AI -
https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760

0 टिप्पण्या
ही प्रायव्हेट वेबसाईट असून. डॉ. बाबासाहेब रेणुशे सरांचे मार्गदर्शन व आरोग्य विषयक सल्ले या वेबसाईट वरती पाहायला मिळतील.