Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone

 Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone

पित्ताशात स्टोन होणे म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन आढळून येणे ही सामान्य समस्या आहे. महिला आणि लठ्ठ लोकांव्यतिरिक्त वृद्ध आणि लहान मुले देखील या समस्येने ग्रस्त असतता.


नक्कीच, हा रोग इतका धोकादायक नाही, पण त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार जितक्या लवकर आपल्याला माहित पडतील तितक्या लवकर आपण त्याच्या त्रासदायक समस्यांपासून आराम किंवा मुक्ती मिळवू शकतो.

Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone
 Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone

 Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone

कधी कधी दुर्लक्ष केल्यामुळे पित्ताशय काढून टाकण्याची देखील वेळ येऊ शकते. कोणत्याही आजाराचे वेळेत उपचार झालेले कधीही चांगलं असतं. म्हणून चला तर जाणून घेऊया पित्ताशयातील स्टोन म्हणजे नेमकं असतं तरी काय? शिवाय या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचारांबद्दल सुद्धा माहिती जाणून घ्या.


गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे नेमकं काय असतं?

पित्ताशयाची थैली पोटाच्या उजव्या भागात बरोबर यकृताखाली एक लहान पेर फळाच्या आकाराचा एक अवयव असतो. त्याचे कार्य पित्त घट्ट करणं हे असते. हे पचनक्रियेमध्ये खूप मदत करते.


हे यकृतमध्ये तयार केले होते, पित्ताशयात साठवले जाते आणि नंतर आतड्यात जाऊन अन्नाचे पचन करण्यास मदत करते. पित्ताशयात अधिकचे स्टोन्स तेव्हा बनतात जेव्हा पित्तात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल तयार होते. 'Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत, दुर्लक्ष केल्यास येऊ शकते पित्ताशय काढून टाकण्याची वेळ!'


हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या (Harvard Health Publication) मते, 80 टक्के पित्त स्टोन्स हे कोलेस्ट्रॉलपासून बनतात. इतर 20 टक्के पित्त स्टोन्स हे कॅल्शियम सॉल्ट आणि बिलीरुबीनपासून बनतात.


पित्ताशयात स्टोन्स होण्याची कारणे काय आहेत?


पित्तामध्ये कोलेस्टेरॉल तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या सर्वांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास पित्ताशयात खडे तयार होतात असे मानले जाते.


बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि या अतिरिक्त कोलेस्टेरॉलचे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारा त्रास आहे. Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone


पित्ताशयात खडे होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढतो –


  • प्रमाणापेक्षा जास्त वजन

  • स्त्री – स्त्रियांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचा त्रास पुरुषांपेक्षा २ – ३ पटींनी जास्त आढळतो.

  • ४० वर्षांपेक्षा जास्त वय

  • स्त्रियांमध्ये मुले झाल्यानंतर – गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते व म्हणूनच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.

  • पित्ता मध्ये खूप जास्त बिलीरुबीन

बिलीरुबीन हे एक केमिकल आहे हे जेव्हा आपले यकृत (liver) जुन्या लाल रक्त पेशी नष्ट करते तेव्हा बनते. काही विशिष्ट परिस्थितींमुळे जसं की रक्ताचे विकार यासारख्या परिस्थितीत यकृताला जितके बिलीरुबिन आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त तयार होऊ लागते. जेव्हा पित्ताशय जेव्हा अतिरिक्त बिलीरुबीन तोडू शकत नाही तेव्हा पिगमेंट स्टोन तयार होतात. हे कडक दगड बहुधा तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात.

  • प्रमाणापेक्षा जास्त पित्त जमा होणं

आपले पित्ताशय निरोगी राहण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी वेळोवेळी पित्ताशयाची थैली रिक्त करणे आवश्यक असते. जर ही पित्ताशयाची थैली पित्त सामग्री रिक्त करण्यात अयशस्वी ठरली तर पित्त जास्त प्रमाणात जमा होऊ लागते, ज्यामुळे पित्ताशयात स्टोन तयार होऊ लागतात.


पित्ताशयात स्टोन झाल्याची लक्षणे काय आहेत?


पित्ताशयातील खड्यांमुळे होणार त्रास हा व्यक्तिगणिक वेगळा असू शकतो. परंतु काही लक्षणे पित्ताशयाच्या सर्व त्रासांमध्ये आढळतात. या त्रासाची सुरुवात सहसा पोटाच्या वरील भागात मध्यभागी किंवा उजवीकडे दुखण्याने होते.


नेहमी आढळणारी लक्षणे अशी –

  • पोटात तीव्र वेदना
  • या वेदना पोटातून उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जातात.
  • जेवल्यानंतर / काही खाल्ल्यानंतर विशेषतः चरबीयुक्त (तेल-तूप असणारे) पदार्थ खाल्ल्यानंतर या वेदना वाढतात.
  • पोटात टोचल्यासारखे / कळ येऊन दुखते किंवा मध्यम तीव्रतेचे पण सतत दुखते.
  • दीर्घ श्वास घेतल्यावर वेदना वाढतात.
  • छातीत दुखते.
  • छातीत जळजळ, अपचन पोटात वाट धरणे.
  • पोट सतत फुगल्यासारखे वाटणे,पोटात गुबारा धरणे.
  • मळमळ, उलट्या, ताप येणे.
  • थंडीने हुडहुडी भरणे.
  • पोटात विशेषतः वरच्या भागात उजव्या बाजूला हात लावल्यावर दुखणे.
  • कावीळ – त्वचा, डोळे पिवळसर दिसणे.
  • शौचाचा रंग बदलणे – फिका / मातकट दिसणे.

काही वेळा विशेषतः जर खडे पित्ताच्या प्रवाहाला अडथळा करत नसतील किंवा अडकलेले नसतील तर त्या व्यक्तीला कुठलीही लक्षणे दिसत / जाणवत नाहीत.


अशावेळी पित्ताशयातील खडे इतर काही कारणांसाठी केलेल्या क्ष – किरण / पोटाची सोनोग्राफी / CT – scan तपासणीत किंवा पोटाच्या इतर शस्त्रक्रियेत देखील आढळून येतात. Gallstones : ‘ही’ लक्षणे देतात पित्ताशयात स्टोन झाल्याचे संकेत #gallstone


आपल्याला जर पित्ताशयातील खड्यांची कुठलीही लक्षणे आढळून आली तर त्वरित निदान व उपचारांसाठी आपल्या सर्जनशी संपर्क साधावा.


पित्ताशयात स्टोन झाल्यामुळे पोटाच्या उजव्या भागात अधून-मधून वेदना होऊ शकतात. असं तेव्हा होतं जेव्हा आपण भरपूर प्रमाणात चरबीयुक्त फॅट असलेले खाद्यपदार्थ खातो.


पण ही वेदना एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. मळमळ, उलट्या, गडद रंगाची लघवी, मातीच्या रंगाचा मल, पोटात वेदना, बर्पिंग, अतिसार आणि आंबट ढेकर या लक्षणांचा समावेश आहे.


पित्त स्टोनचा उपचार कसा केला जातो?

जोपर्यंत आपल्याला तीव्र वेदना होत नाहीत तोपर्यंत आपल्याला पित्ताशयाची स्टोन्सचा उपचार करण्याची आवश्यकता भासणारच नाही असंही होऊ शकतं. कधी कधी हे स्टोन्स आपल्या लक्षात न येता लघवीतून स्वतःहून पडून देखील जाऊ शकतात.


आपल्याला तीव्र वेदना होत असल्यास डॉक्टर तात्पुरता आराम पडण्यासाठी इंजेक्शन देईल, पण काही प्रकरणांत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देखील देऊ शकतात. क्वचित प्रसंगी डॉक्टर औषध लिहून देतात.


जर शस्त्रक्रिया आपल्यासाठी धोकादायक असेल तर ड्रेनेज ट्यूब त्वचेच्या माध्यमातून पित्ताशयामध्ये ठेवली जाऊ शकते. इतर वैद्यकीय परिस्थितींचा उपचार करून जोखीम कमी होईपर्यंत तुम्ही ही पित्ताशयाच्या स्टोनची शस्त्रक्रिया पुढे ढकलू शकता.


पित्ताशयाच्या स्टोन्सचे घरगुती उपचार

  • एक निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा
  • अँटीइन्फ्लेमेटरी आहार घ्या
  • नियमित व्यायाम करा
  • वेगाने वजन कमी करणे टाळा
  • तुमची इच्छा असल्यास तुम्ही व्हिटॅमिन सी, लोह आणि लेसिथिनने युक्त अशा काही पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला आहार देखील घेऊ शकता.
  • एका विश्लेषणामध्ये असे आढळले आहे की पित्ताशयाच्या स्टोन्सचा धोका कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि लेसिथिन प्रभावी आहेत.
  • काही लोक पित्ताशयाची थैली साफ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस वापरण्याचा सल्ला देतात.


पित्ताशयात स्टोन असल्यास या पदार्थांपासून राहा चार हात दूर


  • शक्य तितके चरबीचे सेवन कमी करा
  • मलविसर्जनाची क्रिया मजबूत करण्यासाठी व मल पातळ करण्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त फायबरचा समावेश करा
  • कॅफिनयुक्त पेये, हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्ससोबतच अतिसार होण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ टाळा
  • दररोज हलके-फुलके खाद्यपदार्थ खा. हलके पदार्थ पचवणं शरीराला सोपं आहे
  • पुरेसे पाणी प्या. दररोज सुमारे 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा
  • आपणास वजन कमी करायचं असेल तर ते हळू हळू करा. प्रत्येक आठवड्यात 2 पौंडपेक्षा जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. वेगाने वजन कमी केल्याने पित्त स्टोन आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढू शकतो
  • जर तुम्हाला पित्ताशयामध्ये स्टोन असल्याची शंका वाटत असेल पण कोणतीही लक्षणे दिसून येत नसतील तर उपचारांची आवश्यकता नाही. तरीही आपण जीवनशैलीमध्ये बदल करु शकता जेणेकरुन ही समस्या मोठी होऊ नये आणि नवी कोणती समस्या उद्भवू नये.


खडे होण्याचं टाळण्यासाठी काय करावं ?

  • जेवणातील तेल-तूपाचं प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावं, म्हणजे फोडणीसाठी माफक

  • तेल, भातावर थोडं साजूक तूप (हे लोणी कढवून घरी बनवलेलं तूपच असावं) इतकं चालेल. पनीर, खोबर व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.

  • तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.

  • जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.

  • चिकू , सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळ अशी फळे आवर्जून खावीत.

  • रोज नियमित व्यायाम करावा. एक तास रोज चालायला जावं.

  • पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधं उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. तसंच ती बरीच खर्चिक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असतं. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत असं सांगता येत नाही.


त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)

पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७० - ८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अश्या खड्यांना सायलेंट खडे म्हणतात.


जर खड्यांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झालं नसेल तर असे खडे काढणं आवश्यक नसतं. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचं नाही.


त्यावर फक्त लक्ष ठेवावं व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खड्यामुळे त्रास होत असेल, तरच त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असते.


 पित्ताशयातील खड्यांमुळे होणारे गुंतागुंत -


पित्ताशयाला सूज: पित्ताशयातील खडे जर पित्ताशयाच्या अरुंद तोंडाशी अडकले तर तिथे जंतुसंसर्ग होऊन पित्ताशयाला सूज येते. यामुळे अतिशय तीव्र वेदना होतात व ताप येतो.


पित्ताशयात पू होणे: तीव्र जंतुसंसर्ग झाल्यास पित्ताशयात पू तयार होतो व गळू होऊ शकते. अशा वेळी अँटी-बायोटिक्सचा उपयोग होतोच असे नाही. असे झाल्यास तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.


पित्ताशय फुटणे: खूप सुजलेले पित्ताशय कधी कधी फुटू शकते व आतील सर्व पू / जंतुसंसर्ग सर्व पोटात पसरतो. अशा वेळी तोंडावाटे घ्यायच्या अँटी-बायोटिक्सचा उपयोग होत नाही तर ते शिरेवाटे द्यावे लागते. तसेच तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.


पित्तनलिकेला अडथळा: पित्त्ताशयामधून व यकृतामधून ज्या नलिकांद्वारे पित्त आतड्यात जाते त्या नलिकांमध्ये हे खडे अडकू शकतात. असे झाल्यास कावीळ किंवा पित्तनलिकेला सूज येऊ शकते.


स्वादुपिंडाच्या नलिकेला अडथळा: पॅनक्रिया / स्वादुपिंडामधून येणारी नलिका पित्तनलिकेला छोट्या आतड्याजवळ मिळते. स्वादुपिंडातून स्रवणारी पाचक द्रव्ये या नलिकांद्वारे छोट्या आतड्यात सोडली जातात.


याठिकाणी जर पित्ताशयातील खडा अडकला तर पॅनक्रिया / स्वादुपिंडाला देखील सूज येऊ शकते. स्वादुपिंडाचे सूज ही गंभीर स्थिती असून रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागते. अतिदक्षता विभागात देखील ठेवावे लागू शकते.


पित्ताशयाचा कर्करोग: पित्ताशयातील खड्यांचा त्रास असलेल्या व्यक्तींना पित्ताशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.


पित्ताशयातील खड्यांचे निदान - 


पित्ताशयात खडे असून देखील बऱ्याच लोकांना त्याचा काही त्रास / लक्षणे जाणवत नाहीत. हे खडे अनेकदा इतर काही कारणांसाठी केलेल्या तपासणीत आढळून येतात.


आपल्याला जर काही लक्षणे दिसत / जाणवत असतील तर त्वरित आपल्या सर्जनशी संपर्क साधावा. त्यामुळे आपल्या त्रासाचे योग्य निदान होईल. 


 पोटाची सोनोग्राफी: सहसा पित्ताशयात खडे असल्याचे निदान पोटाची सोनोग्राफी करून करता येते. या तंत्रामध्ये उच्च वारंवारितेच्या ध्वनी लहरी त्वचेमार्फत शरीरात सोडल्या जातात.


त्या शरीरातील अवयवांवर आदळल्यामुळे ज्या प्रतिमा तयार होतात त्या मॉनिटर वर दिसतात. ही तपासणी केवळ १० – १५ मिनिटात पूर्ण होते तसेच यात रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत.


पित्तनलिकेमध्ये असलेले खडे कधीकधी या तंत्राद्वारे दिसू शकतात. पण ते दिसले नाहीत तर त्यासाठी MRI स्कॅन ही तपासणी लागते.


एमआरआय (MRI) स्कॅन: पित्तनलिकेमधील खडे पाहण्यासाठी एमआरआय स्कॅन केले जाते. या तपासणीमध्ये शरीराच्या आतील अवयवांच्या तपशीलवार प्रतिमा तयार केल्या जातात.


कोलँजिओग्राफी: या तपासणीमुळे आणखी सखोल माहिती मिळू शकते. या प्रक्रियेत एक विशिष्ट डाय / रंग आपल्या रक्तप्रवाहात सोडला जातो.


पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेच्यावेळी पित्तनलिका बघण्यासाठी असे करता येते किंवा एंडोस्कोपद्वारे (पुढे कॅमेरा असलेली एक पातळ ट्यूब) हा डाय / रंग शरीरात सोडून पित्तनलिका / स्वादुपिंड नलिकेमध्ये काही अडथळा आहे का हे पाहता येते.


पित्तनलिका / स्वादुपिंड नलिकेमध्ये खडे अडकले असल्यास ते त्याच वेळी एंडोस्कोपद्वारे काढता येतात. या प्रक्रियेला एंडोस्कोपिक रिट्रोग्रेड कोलँजिओ-पॅनक्रिएटोग्राफी (ERCP) म्हटले जाते.


सीटी स्कॅन: पित्तशतखड्यांमुळे झालेल्या गुंतागुंतीचे (उदा: स्वादुपिंडाला सूज) निदान करण्यासाठी सहसा सीटी स्कॅन ही तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये वेगवेगळ्या कोनातून अनेक क्ष – किरण प्रतिमा घेतल्या जातात.





पित्ताशयातील खड्यांसाठी उपचार-


आपली उपचार योजना आपल्याला होणाऱ्या त्रासाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. रुग्णाला तपासल्यानंतर सर्जन आपल्याला योग्य तो पर्याय सुचवतात.


औषधोपचार / शस्त्रक्रिया न करता केलेले उपचारः शस्त्रक्रिया (पित्ताशय काढणे – cholecystectomy) ही पित्ताशयातील खड्यांच्या उपचारांची मुख्य पद्धत आहे. परंतु रुग्ण जर शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त नसेल किंवा शस्त्रक्रिया करण्यास नकार देत असेल तर आपले डॉक्टर काही औषधोपचार सुचवू शकतात.


हे उपचार रुग्णाला त्यावेळी होत असणारा त्रास / जंतुसंसर्ग किंवा त्यावेळी त्रास देत असलेले खडे नष्ट करण्यास मदत करतात. परंतु हे उपचार नवीन खडे तयार होण्यास प्रतिबंध करू शकत नाहीत तसेच वारंवार होणार त्रास थांबवू शकत नाहीत.   


लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी (दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे): आपल्या पोटावर तीन ते चार लहान छेद घेतले जातात. एक छेद (२ – ३ से.मी. दरम्यान) नाभीजवळ घेतला जातो आणि इतर छेद (प्रत्येकी 1 सेमी किंवा कमी) पोटाच्या उजव्या बाजूला असतात.


कार्बन डाय ऑक्साईड वायूचा वापर करून तुमचे पोट फुगवले जाते. एका छेदामधून लॅपरोस्कोप (एक लांब, पातळ टेलिस्कोप – याच्या तोंडाशी प्रकाश आणि व्हिडियो कॅमेरा असतो) पोटात घातला जातो.


यामुळे आपल्या सर्जनला शस्त्रक्रिया व्हिडिओ मॉनिटरवर दिसते. शस्त्रक्रियेची साधने वापरून आपले पित्ताशय काढून टाकले जाते. पित्ताशय काढल्यानंतर आत सोडलेला वायू लॅपरोस्कोपमधून बाहेर पडतो.


पोटावरचे छेद विरघळण्याऱ्या टाक्यांनी बंद केले जातात आणि ड्रेसिंगने झाकले जातात. शस्त्रक्रियेसाठी सुमारे ६० ते ९० मिनिटे लागतात.


ओपन (पारंपारिक) / पोटावर छेद घेऊन केलेली शस्त्रक्रिया: काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे किंवा रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी Laparoscopic cholecystectomy / दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे योग्य ठरत नाही.


अशावेळी पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये पोटाच्या वरच्या भागात मध्यभागी किंवा उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली सुमारे १४ – १५ से. मी. (४ – ६ इंच) लांब छेद घेतला जातो व पित्ताशय काढले जाते.


दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना जर काही गुंतागुंत (उदा: अतिरिक्त रक्तस्त्राव) झाली तर मोठा छेद घेऊन शस्त्रक्रिया करावी लागते. असे होण्याची शक्यता ५ % असते.  


ही शस्त्रक्रिया देखील दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेइतकीच प्रभावी आहे, परंतु यानंतर रुग्णाला पूर्ववत होण्यास थोडा जास्त वेळ लागतो. सहसा पोटावर छेद घेउन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत होण्यास ४ – ६ आठवडे लागतात.


शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत होणे- 

शस्त्रक्रियेदरम्यान दिल्या जाणाऱ्या भुलीची औषधे बंद केल्यानंतर रुग्णाला काही काळ शस्त्रक्रिया विभागातील देखभाल कक्षात (रिकव्हरी रूम) मध्ये ठेवले जाते. त्यानंतर रुग्णाला आपल्या खोलीत नेले जाते. पूर्ववत होण्याचा कालावधी आपल्या शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार बदलतो. 


दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया / लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी: सहसा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यानंतर लोक २ दिवसात घरी जाऊ शकतात. काहीवेळा रुग्णाला रुग्णालयात आणखी एक रात्र  राहण्याची गरज असते.


सर्वसाधारणपणे रुग्ण खायला, प्यायला लागला असेल आणि आधार न घेता चालू शकत असेल तर डॉक्टर रुग्णाला घरी जाण्याची परवानगी देऊ शकतात. पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो.


पोटावर छेद घेऊन केलेली शस्त्रक्रिया / ओपन कोलेसिस्टेक्टॉमी: या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात ४ – ५ दिवस राहावे लागू शकते. घरी परत आल्यावर पूर्णपणे बरे होण्यासाठी सरासरी चार ते सहा आठवडे लागू शकतात.


बहुतेक लोक दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर एक किंवा दोन आठवड्यात पूर्ण बरे होतात आणि कामाला सुरुवात तसेच हलका व्यायामही करू शकतात. जास्त श्रमाचे व्यायाम / काम करण्यासाठी १ महिना थांबावे.


पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बरे होण्यासाठी थोडा अधिक कालावधी लागतो.  


गाडी चालवणे –


गाडी चालवण्याआधी आपल्या सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ब्रेक दाबताना जोपर्यंत दुखणे /अस्वस्थता असेल तोपर्यंत गाडी चालवणे टाळावे (गाडी बंद असताना सराव करून पाहावे).


सहसा दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर १ – २ आठवड्यात गाडी चालवता येते. Open / पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर मात्र हा कालावधी थोडा वाढू शकतो. 


काही विमा कंपन्या शस्त्रक्रियेनंतर ठराविक आठवड्यांसाठी गाडी चालवल्यास रकमेची भरपाई करत नाहीत म्हणून गाडी चालविणे सुरु करण्याआधी आपण आपल्या विमा कंपनीला सांगणे उचित आहे.


माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760


The Adventures of Lily and Max Bedtime Stories for Kids



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या