युरिक अ‍ॅसिड | Uric Acid

 युरिक अ‍ॅसिड | Uric Acid

कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोडय़ा दिवसांत बरी होत नसेल तर ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. 

युरिक अ‍ॅसिड | Uric Acid
 युरिक अ‍ॅसिड | Uric Acid


युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अनेक तरुण, मध्यमवयीन व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. ‘युरिक अ‍ॅसिड’ म्हणजे नेमके काय, ते कशाने वाढते, काय खावे, जेणेकरून ते सतत नियंत्रणात राहील. 

गुणात्मकदृष्टय़ा आयुर्वेदाच्या नजरेतून जाणून घेणार आहोत. योग्य प्रकारे पथ्य अवलंबल्यास यातून कायमची सुटका मिळू शकते.

युरिक अ‍ॅसिड वाढलेले असताना वा त्याची प्रवृत्ती असताना मका व तत्सम पदार्थ पूर्णत: टाळायला हवेत. कोणत्याही देशातून आलेला, कोणत्याही चवीचा मका युरिक अ‍ॅसिडचा त्रास असताना टाळावा. 

उडीद डाळ, चण्याची डाळ, राजमा, वाळवलेले कडवे वाल, गोडे वाल, वाटाणे यांचे सेवन युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण तात्काळ वाढवते. कुळिथाचा वापर वात व्याधीत फायदेशीर असला तरी युरिक अ‍ॅसिडद्वारे होणाऱ्या संधिवातामध्ये तो वर्ज्य आहे. 

पालक, चुका अंबाडी, मेथीची भाजी, करडई या पालेभाज्या त्रास वाढवताना दिसून येतात. साबुदाणा, भगर, दही हे पदार्थ टाळलेले उत्तम. डाळींच्या पिठाचे डांगरसुद्धा हा त्रास वाढवते. 

उसाचा रस, चिंचेचा वापर या व्यक्तींनी टाळल्यास फायदा होतो. बाजारात सध्या उपलब्ध असणारे हवाबंद डब्यातील किंवा पाकिटातील पदार्थही टाळावेत. 

हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेल्या रासायनिक घटकांमुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, विशेष करून आइस्क्रीमसारख्या वात वाढवणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये. 

पाणीपुरीमधील पुरीसुद्धा या आजारामध्ये त्रास वाढवते. नासवलेले पदार्थ, त्यातही अनैसर्गिकरीत्या नासवलेले पदार्थ हा आजार असताना खाऊ  नयेत. 

डाळींचा आहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये. कोणत्याही प्रकारे केलेल्या उडिदाच्या पापडामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते.

काय खावे?

युरिक अ‍ॅसिडच्या त्रासामध्ये न खाण्याचीच यादी मोठी असते, हा विचार करून कित्येक व्यक्ती पथ्य सोडून देतात आणि व्याधी वाढवून घेतात; परंतु खाण्याचे खूप उत्तम चविष्ट प्रकार युरिक अ‍ॅसिड कमी करताना दिसून येतात. 

यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. विविध भाज्यांमध्ये हळदीचे प्रमाण वाढवावे, तसेच हळद आणि आल्याचे लोणचे नियमित खावे. 

मूग, मसूर, तूर पाण्यात हळद टाकून त्याचे सूप सेवन केल्यास उत्तम. मूग, मसूर, तूर, मटकी यांचे घट्ट वरण निषिद्ध असले तरी त्याचे शिजवलेले पातळ पाणी ऊर्जा देणारे असून या आजाराचा त्रास कमी करते. 

बऱ्याच रानभाज्या खाण्यानेही फायदा होतो. तांदुळका, चाकवत, लाल माठ, शेवगा पाने, करडी, सरसू, पुनर्नवा उपयुक्त ठरतात.

गुळवेल ही वनस्पती अनेकांना परिचित असेल. त्याच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. 

यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. कारली, पडवळ या भाज्यादेखील फायदेशीर आहेत. मात्र यामध्ये डाळी घालू नयेत. 

धने व जिरे घालून पाणी उकळावे आणि नंतर ते गाळून दिवसभरात सेवन केल्यास त्रास कमी होतो.

मांसाहार आणि युरिक अ‍ॅसिड

मांसाहारी व्यक्तींना त्रास झाल्यास झिंगे, खेकडे, बोकडाचे मटन, भेजा, सुके मासे, हलवा हे पदार्थ टाळावेत. उकडलेली अंडीसुद्धा खाणे शक्यतो टाळावे. 

हे पदार्थ शिजवताना त्यामध्ये तीळ, दगडफूल, मिरे, सुंठ यांचा अधिक वापर केल्यास ते बाधण्याची शक्यता कमी असते. तळलेले मासे मात्र खाऊ  नयेत. 

मांसाहाराच्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर करावा. लाल मिरची, धने, जिरे, किंचित मेथी दाणे असलेले वाटप भेंडी, बटाटा, मासे तयार करताना आवर्जून घालावे. 

डुकराचे मांस, सुकवलेले मासे, साठवलेले मांस यांचे सेवनही अहितकारक आहे. पांढऱ्या पाण्याचे पापलेट, सुरमई, रावस, मांदेली, करली आदी लहान माशांचा वापर वरील वाटप करून करावा. 

भाजलेले मांस किंवा मासे म्हणजेच तंदूर खाल्ल्यास फायदा होतो. त्याला मिरे, दालचिनी, दगडफूल यांचे वाटलेले मिश्रण लावावे. युरिक अ‍ॅसिडचा त्रास असताना दह्य़ाचे सेवन करू नये. 

सर्व प्रकारच्या कोशिंबिरी, रायते, फ्रुट सॅलड तसेच दही घालून केलेल्या भाज्यांमुळे युरिक अ‍ॅसिडचा त्रास वाढतो. ताकसुद्धा आंबट असल्यास रुग्णांनी टाळावे. 

आहारामध्ये वरून मीठ घेऊन खाण्याची सवय रुग्णांना त्रासदायक ठरू शकते. हवाबंद डब्यातील पदार्थामध्ये मिठाचा वापर अधिक होत असल्याने त्यांचे सेवन टाळलेले उत्तम. 

मैद्याचे तळलेले पदार्थ रुग्णांनी सेवन केल्यास तात्काळ त्रास होण्याची शक्यता असतो.

युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. 

वात विकारांमध्ये युरिक अ‍ॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे सेवन या व्यक्तींनी टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास फायदेशीर असते. 

युरिक अ‍ॅसिड ही एक अवस्था असून पथ्यांचे पालन करून आरोग्यदायी पदार्थाचे सेवन केल्यास या अवस्थेतून बाहेर पडणे सहज शक्य आहे. - वात स्पेशालिस्ट डॉ. बाबासाहेब रेणुशे, M.D Medicine (Ayu), प्रज्ञा हॉस्पिटल,  कोकण नगर, रत्‍नागिरी. 7057394036.

 युरिक अ‍ॅसिड | Uric Acid

युरिक ॲसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं की गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात प्यूरिनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे हा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. 

साधारणपणे आपलं शरीर हे किडनीमार्फत युरिक ॲसिड फिल्टर करत असतं. जर तुम्ही प्यूरिनचं सेवन मोठ्या प्रमाणावर करत असाल तर शरीराला हे ॲसिड फिल्टर करण्यासाठी अडचणी येतात.  'युरिक अ‍ॅसिड | Uric Acid'

या स्थितीला Hyperuricemia असं सुद्धा म्हटलं जातं. यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते. आज मी डॉ. बाबासाहेब  रेणुशे  तुम्हाला युरिक ॲसिड वाढण्याची कारणं आणि उपाय सांगणार आहे.

Uric acid वाढण्याची कारणे .

अनियमीत आणि चुकीच्या आहाराचे सेवन

मासाहार किंवा भात, पनीर, राजमा यांचे जास्त सेवन

जास्तवेळपर्यंत उपाशी राहणं

लठ्ठपणा

डायबिटीसच्या रुग्णांना ही समस्या जास्त उद्भवते.


युरीक ॲसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे ३० वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो.  युरिक अ‍ॅसिड | Uric Acid

हे शरीरातील यूरिक ॲसिडमुळे होते. जे ब्लड सक्क्युलेशनद्वारे किडनी पर्यंत पोहोचते आणि युरीन मार्गे बाहेर निघून जाते. 

युरीक ॲसिड वाढल्यानंतर शरीरात गाठी सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते.


Uric acid कमी करण्याचे उपाय

युरिक ॲसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्यूरिनयुक्त पदार्थाचा आहारात समावेश कमी करा. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित राहील.

युरिक ॲसिडचा त्रास असणाऱ्या लोकांनी दिवसा झोपू नये.

साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू नये. कोल्ड्रिंक्स, सोडा, फ्रेश फ्रुट ज्यूसमध्ये फ़रुक्टोज आणि ग्लुकोज असते. रिफाइंड आणि पाकिटातील पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक ॲसिड वाढण्याची शक्यता असते.

जास्तीत जास्त पाणी प्यावे. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील युरीक ॲसिड जलद गतीने बाहेर पडण्यास मदत होते. हवं तर तुम्ही आपल्या फोनमध्ये पाणी पिण्याचे रिमाडंर लावू शकता. शक्यतो गरम पाण्याचे सेवन टाळावे. "युरिक अ‍ॅसिड | Uric Acid"

गुळवेलाच्या पानांची भाजी युरिक ॲसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. त्यासाठी गुळवेलाचे सेवन करावे.

आहारात फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा. चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या २ ते ३ तास आधी स्क्रिनपासून लांब राहावे. रोज नियमीत व्यायाम करून तुम्ही या त्रासापासून आपली सुटका करू शकता.

मासांहार, अंडी, राजमा, मशरूम या पदार्थाचे सेवन कमी करावे. 


युरिक ॲसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा!

गुडघे, पायांची बोटे आणि टाचा दुखत असतील तर शरीरात युरिक ॲसिड वाढल्याचे समजावे. घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येते जसे... 

* सकाळी रिकाम्यापोटी दोन -तीन आक्रोड  खावेत. 

* जेवणानंतर चमचाभर जवस चावून खाता येईल. 

* कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस यांचे मिश्रण पिता येईल. 

* दररोज नारळपाणी प्यायल्याने ही दूर होते. 

* आहारात ओव्याचा समावेश करावा. पाण्यासोबत ओवा खाता येईल.  

* चमचाभर अश्वगंधाची पूड, चमचाभर मध गरम दुधात घालून प्या. उन्हाळ्यात अश्वगंधाचे प्रमाण कमी ठेवावे. 

* युरिक ॲसिडमुळे शरीरात गाठी होतात. हे टाळण्यासाठी पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा घालून प्या. यामुळे गाठी विरघळतात. 

अतिरिक्त औषधे घेणे, आवश्यकतेपेक्षा जास्त प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असणे शिवाय व्यायाम, शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे शरीरात युरिक ऑसिड वाढू शकते.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ऑसिड, जीवनसत्त्व, मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटिन, आयर्न असते. जे आरोग्यासाठी चांगले असतात. रोज सकाळी रिकाम्यापोटी 2-3 अक्रोड खाल्ल्यामुळे युरिक ऑसिड नियंत्रणात राहते.

युरिक ऑसिड वाढले की शरीरात लवकर पसरते आणि गाठी होतात. अशावेळी एक चमचा बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यात मिसळून घ्या. यामुळे शरीरातील गाठी विरघळण्यास मदत होते. शिवाय युरिक ऑसिडचे प्रमाणही कमी होते.

हातपाय धरणे, सांधेदुखी, अवयव सुजणे, उठण्या-बसण्यास त्रास होणे हे आजार शरीरात युरिक ऑसिड वाढल्यामुळे होतात.

एक चमचा मधात अश्वगंधा पावडर मिसळा. हे मिश्रण दुधासोबत घ्या. उन्हाळ्यात किंवा गरम वातावरणात हे औषध कमीत कमी सेवन करा.

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेले युरिक ऑसिड युरिनवाटे शरीराबाहेर निघून जाते. ऊर्जाही टिकून राहते.

दररोज जेवणामध्ये ओव्याचा वापर केल्यास युरिक ऑसिडचे प्रमाण कमी होते.

शरीरात मेदाचे प्रमाण वाढले की, वजन वाढते. यामुळे युरिक ऑसिड वाढण्याची शक्यता जास्त असते.

युरिक ऑसिडचे शरीरातील प्रमाण कमी करण्यासाठी बेकरी प्रोडक्ट, रेडी टू सर्व्ह, अति मांसाहार टाळावा.

दररोज बीट, सफरचंद आणि गाजराचा रस प्यावा. यामुळे शरीराचा पीएच स्तर वाढतो आणि युरिक ऑसिड नियंत्रणात राहते.

- वात स्पेशालिस्ट डॉ. बाबासाहेब रेणुशे, M.D Medicine (Ayu), प्रज्ञा हॉस्पिटल  कोकण नगर रत्‍नागिरी

Important Links - 

YouTube Video of Dr Babasaheb Renushe - 

https://www.youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&jct=8wfakfM0-afG_psqAU5ASXwSLXxgLg

https://www.youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBicqDK4Ae5BQE-o2imj_Bp62&jct=7wIntm0OhuqXdlttE14QQIlDWlqBEA

https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBieLVK6jyyEhvOgqbNolVz_V&si=2wKynfi-4HtQ_7gx

माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा

आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.

ओ.पी.डी वेळ :

प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 
सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या