मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी CHIEF MINISTER'S RELIEF FUND

CHIEF MINISTER'S RELIEF FUND मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत नवीन खर्चिक आजारांचा समावेश

Chief Minister's Relief Fund
Chief Minister's Relief Fund


महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

CHIEF MINISTER'S RELIEF FUND

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत नवीन आजारांचा समावेश केला आहे. 'CHIEF MINISTER'S RELIEF FUND' विशेष बाब म्हणजे याआधी या योजनेत मोजक्याच आजारांचा समावेश होता. मात्र आता खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

RELIEF FUND

जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असं आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे


१. अर्ज ( विहीत नमुन्यात)

२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.CHIEF MINISTER'S RELIEF FUND

(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) 

४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 

७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC रिपोर्ट आवश्यक आहे.

८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC/ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

CHIEF MINISTER FUND

● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.

१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),

२. हृदय प्रत्यारोपण

३. यकृत प्रत्यारोपण

४. किडणी प्रत्यारोपण

६. बोन मॅरो प्रत्यारोपण

५. फुफ्फुस प्रत्यारोपण

७. हाताचे प्रत्यारोपण

८. हिप रिप्लेसमेंट

९. कर्करोग शस्त्रक्रिया

१०. अपघात शस्त्रक्रिया

११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया

१२. मेंदूचे आजार

१३. हृदयरोग

१४. डायलिसिस 

१५. अपघात

१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

१७. नवजात शिशुंचे आजार

१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण 

१९. बर्न रुग्ण

२०. विद्युत अपघात रुग्ण

#महाराष्ट्र गतिमान


गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी aao.cmrf-mh@gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. "MINISTER'S RELIEF FUND" तसेच रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ उपलब्ध करून देण्यात आला आहे. 



12-04-2026

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू


मदत आणि उपचाराला मिळणार गती

 *आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार*


मुंबई :--- राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. 


 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे.

या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे.


 विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत.

त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे

माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.


       गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही

बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे. 


 रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी

कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची

प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. 


यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेच, गेल्या आर्थिक वर्षात

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना

३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख  रामेश्वर नाईक म्हणाले की,

रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून,

त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


YouTube: Dr BABASAHEB RENUSHE: Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


PODCAST -

https://youtu.be/xUQBYKJrXXo



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या