जमिनीवर मांडी घालून बसून जेवण केल्याने काय होतं?
फायदे वाचाल तर डायनिंग टेबल विसराल
आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. जुन्या चांगल्या गोष्टी आणि सवयी मागे पडत चालल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की, आधी घरात सगळे लोक एकत्र खाली बसून जेवण करत होते. पण आता लोकांच्या घरात डायनिंग टेबल आला आहे. लोक सोफ्यावर बसूनही जेवण करतात. मात्र, त्यांना खाली बसून जेवण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खाली बसून जेवण्याच्या सवयीने तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळतात. महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदातही याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत.
खाली बसून जेवण्याचे फायदे -
शरीराची हालचाल वाढते.
जमिनीवर खाली बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचतं. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यात मदत होते. तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटाचे विकारही होत नाहीत.
नसा मोकळ्या होतात
जेवण करताना मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा मोकळ्या होतात. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवतो, तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.
आवश्यक तेवढं जेवण
सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसणे आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण केल्यास योग्य प्रमाणात जेवण करता येतं. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे, तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत राहतं आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते.
पाठीचा कणा चांगला राहतो
पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीच्या समस्या दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असतं. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळतं की, आपलं पोट भरलं आहे. खुर्चीवर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे जात असतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. याने अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जातं.
कॅलरीज कमी होतात
जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येतं. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगलं असतं. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.
गुडघे दुखीची समस्या दूर होते
जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, समस्या दूर राहतात.
हृदय निरोगी राहतं
मांडी घालून बसणं हे वेगवेगळ्या योगासनातील एक आसन आहे. या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असतं आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहतं. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.
जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे
१. पाचन सुधारणे:
पद्मासन किंवा सुखासनात बसून जेवल्याने पाचन प्रक्रिया सुधारते. शरीर पुढे झुकल्याने पोटाच्या स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे पाचन शक्य होते.
२. शरीराच्या स्थितीत सुधारणा:
पाठीला आधार नसल्याने शरीराची स्थिती योग्य राहते आणि पाठीचा कणा सरळ राहतो.
३. वजन व्यवस्थापन:
जमिनीवर बसून जेवल्यास सावकाश आणि सावधपणे जेवणे होते, ज्यामुळे जास्त खाण्याचे टाळले जाते.
४. लवचिकता वाढवते:
जमिनीवर बसल्याने पायांच्या आणि मांड्यांच्या स्नायूंमध्ये लवचिकता वाढते.
५. रक्ताभिसरण सुधारते:
क्रॉस-लेग्ड स्थितीत बसल्याने रक्ताभिसरण अधिक सुरळीत होते.
६. कोर स्नायूंना बळकट करते:
शरीराचा समतोल राखण्यासाठी कोर स्नायूंचा वापर होतो, ज्यामुळे स्नायू बळकट होतात.
७. मनःशांती आणि स्थिरता:
जमिनीवर बसून खाणे मनःशांतीसाठी उपयुक्त ठरते. यामुळे जमिनीशी जवळीक निर्माण होते.
८. दीर्घायुषी होण्यास मदत:
भारत आणि जपानसारख्या देशांमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची प्रथा दीर्घायुष्याशी संबंधित आहे.
९. सामाजिक बंधनं वाढतात:
एकत्र जमिनीवर बसून जेवल्याने सामाजिक स्नेह वाढतो.
निष्कर्ष:
जमिनीवर बसून जेवण्याचे शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक फायदे आहेत.
माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा
आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
ओ.पी.डी वेळ :
प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी ,
सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.
Blog
https://drbabasahebrenushe.blogspot.com/
Quora
https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/
व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts
https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1
Google - https://g.co/kgs/GcvzaB
https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2
Linktree -
https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe
AI -
https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760
The Adventures of Lily and Max Bedtime Stories for Kids
0 टिप्पण्या
ही प्रायव्हेट वेबसाईट असून. डॉ. बाबासाहेब रेणुशे सरांचे मार्गदर्शन व आरोग्य विषयक सल्ले या वेबसाईट वरती पाहायला मिळतील.