मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या Before the marriage of children, take a calm decision

Before the marriage of children, take a calm decision 

मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या

 

मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या
मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या

मिञांनो हा लेख वाचा,

बघा काही बोध  होत का?


समाजात नवीनच प्रथा पडू लागल्या आहेत. त्याचा मुलांच्या वैवाहिक जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.

Before the marriage of children, take a calm decision

अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधुपित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर फक्त एक वेळेस तुम्ही जिथे राहात असाल त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोर्टात एक वेळेस फेर फटका मारून या आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे.


तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु चांगली माणसे हवीत,  आत्ता सध्या कोर्टात वादविवाद, गुन्हेगारांपेक्षा जास्त प्रकरणे ही घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या जास्त दिसायला लागली आहे. 'Before the marriage of children, take a calm decision'


थोडं खोलात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर घटस्फोट का हवा आहे तर खूप मजेशीर उत्तर मिळतात. मुलगा व मुलीकडून, मागच्या वर्षी लग्न झालेल्या एका जोडप्याला जज साहेबांनी विचारले, तुमच्या लग्नाला किती वर्षे झालीत व तुम्ही किती काळ सोबत होता ?

त्यावर दोघांचे उत्तर होते आमचे मागील वर्षी लग्न झाले व आम्ही 2 महिनेच एकत्र होतो.

Before the marriage take a calm decision

दोघेही खूप शिकलेले त्यात मुलगा प्रायव्हेट जॉबला चांगल्या पोस्टवर तर मुलगी शासकीय जॉबला. 

जज साहेबांनी विचारले मग तुम्हाला वेगळे का व्हायचे आहे ?

 त्यावर दोघांचे उत्तर होते आमचे विचार जुळत नाहीत !


मुलगा व मुलीच्या तोंडून हे उत्तर ऐकून तर पायाखालची जमीन सरकली.

एक वेळ होता आपल्या आई-वडिलांची लग्न झालीत तेव्हा त्यांना मुलगा किंवा मुलगी आवडते का हेही विचारले जायचे नाही, घरातल्या मोठ्या व्यक्तींनी ठरवले तर विवाह होत असत आणि ते विवाह शेवटपर्यंत टिकत होते.


मग आजच्या मुला-मुलींना इतके स्वातंत्र्य असल्यावर ही वेळ का येऊ लागली आहे ? 

अजून एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटेल गरीब कुटुंबातील व हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबातील मुला-मुलींचे भांडणे मला कोर्टात आलेली दिसलीच नाहीत. Before the marriage of children, take a calm decision

कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी जास्त जोडपे असतात ते एकतर खूप शिकलेले, लग्नाच्या वेळी अवास्तव मागण्या केलेली व त्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे कोर्टात येणारी मंडळी आहेत.


मुलाच्या बापाकडे खूप प्रॉपर्टी आहे व मुलगा खुप शिकलेला असून चांगल्या नोकरीला आहे म्हणून आमची मुलगी सुखात राहील म्हणून आम्ही मुलगी दिली.

Before the marriage

परंतु जावई व्यसनी आहे, तो आता मुलीला रोज त्रास देतो म्हणून घटस्फोट,  जावयाला लाख भर पगार आहे परंतु शहरात मोठा फ्लॅट किंवा गाडी घ्यायची आहे म्हणून मुलीला सासुरवास केला जातो तिचा छळ केला जातो. 

म्हणून घटस्फोट हवा, दोन चार महिने सासरी राहिलेली मुलगी जिच्या अंगावरची हळद ही निघालेली नसते, मुलगी सुखात राहावी म्हणून आपले सर्वस्वी पणाला लावून देणारा बाप जो आपल्या मुलीचे लग्न लावून देताना पार भिकेला लागतो तो बाप आणि पोर जेव्हा कोर्टात येते त्या वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.


 म्हणून सांगतो, मुलाचे असो वा मुलीचे स्थळ शोधताना माणसे चांगली शोधा.

पैसे, प्रॉपर्टी पाहू नका,  मुलगा टेम्पररी नोकरीला असलेला असो की व्यवसाय करणारा फक्त त्याच्या मनगटात जोर असलेला, निर्व्यसनी हवा, आपल्या मुलीला दोन वेळचे खाऊ घालून सुखात ठेवणारा असावा, नाहीतर महाल विकून झोपड्यात येणारे ही बहाद्दर समाजात आहेत त्यांना वेळीच ओळखा.


मुलाच्या परिवाराकडे किती प्रॉपर्टी आहे हे पाहण्यापेक्षा तो मुलगा स्वतःच्या हिमतीवर काय करू शकतो हे पारखा. 

सुसंस्कृत, निर्व्यसनी, होतकरू, कष्ट करणाऱ्या मुलगा असेल आणि गरीब असेल तरी असे स्थळ हातचे जाऊ देऊ नका, नक्कीच तेथेच तुमची मुलगी ही सुखात राहील हेच खर आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवा. 

तरी मुलगा व मुलीच्या आई वडिलांनी याचा नक्कीच जरूर विचार करावा ही विनंती.

कटू आहे पण सत्य आहे 

आयुष्य खुप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. तसेच दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. 

एकमेकांना प्रेम द्या, अडचणीत मदत करा, संकटसमयी धीर घ्या, आधार द्या. "Before the marriage of children, take a calm decision" 

स्वतःची व आपल्या कुटुंबाची, परिवाराची व समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कायदे नियम व सुचनांचे पालन करा, सरकारला सहकार्य करा.


सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा.

YouTube Video of Dr Babasaheb Renushe - 


https://www.youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&jct=8wfakfM0-afG_psqAU5ASXwSLXxgLg


https://www.youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBicqDK4Ae5BQE-o2imj_Bp62&jct=7wIntm0OhuqXdlttE14QQIlDWlqBEA


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBieLVK6jyyEhvOgqbNolVz_V&si=2wKynfi-4HtQ_7gx


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या