स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid

 स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय  | Uterine Fibroid  

याला 'तंतुस्नायू-अर्बुद' म्हणजेच Fibrosis Uterus असं म्हणतात." फायब्रॉईड्सच्या गाठींची सुरवात गर्भाशयाच्या मधल्या अस्तरात होते. त्यानंतर यांचा आकार हळूहळू वाढत जाऊन ते आतल्या किंवा बाहेरच्या अस्तरावर दवाब आणतात. त्या पुढे लिहितात, "गाठीचा आकार वाढल्याने ओटीपोटातील गर्भाशय पोटाच्या पोकळीत वाढू लागतं.

सामान्य भाषेत सांगायचं झालं तर 'फायब्रॉईड' म्हणजे गर्भाशयात किंवा गर्भाशयाच्या बाजूला तयार होणारी गाठ. फायब्रॉईड्स एक-दोन किंवा अनेक असू शकतात.

स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid
स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid  


स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायब्रॉईड म्हणजे कॅन्सरची गाठ अजिबात नाही. फायब्रॉईड्स स्नायूपेशी (Muscle Cells) आणि तंतुपेशी (Fibroid Cells) यांच्यापासून बनलेले असतात.

फायब्रॉईड्स कशामुळे होतात याचं निश्चित कारण सांगता येत नाही. तज्ज्ञ म्हणतात, तिशीच्या आसपास असलेल्या स्त्रियांपैकी 20 टक्के महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यता असते.

फायब्रॉईड्सची लक्षणं काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार पाळीच्या दिवसात अतिरक्तस्राव होणे, पाळी लवकर येणं आणि पाळीच्या दिवसाच खूप जास्त वेदना होणं याचं एक प्रमुख कारण फायब्रॉईड्स असण्याची शक्यता असते. 'स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid'

फायब्रॉईड्सच्या लक्षणांची माहिती

  1. - पाळीच्या दिवसात होणारा अतिरक्तस्राव
  2. - पाळी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहणे
  3. - सारखं लघवीला होणं
  4. - पाठदुखी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रजननात होणारा त्रास उदाहरणार्थ- वंध्यत्व, एकापेक्षा जास्त वेळा झालेला गर्भपात आणि वेळेआधी येणाऱ्या प्रसूतीकळा ही देखील फायब्रॉईड्सची लक्षणं आहेत.

तज्ज्ञ सांगतात, की गाठ कुठे आहे आणि किती आहेत यावरून महिलांना होणारा त्रास अवलंबून असतो. एक किंवा दोन गाठी असल्या तर त्रास फार जास्त होत नाही. पण, गाठीच्या आकारात वाढ झाली किंवा गाठींची संख्या वाढली तर लक्षणं दिसू लागतात.

फायब्रॉईड्स कशामुळे होतात?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायब्रॉईड्स कशामुळे होतात याचं ठोस कारण नाही. गर्भाशयाचे स्नायू गुळगुळीत आणि लवचिक असतात. या स्नायूंची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे फायब्रॉईड्स तयार होतात.

फायब्रॉईड्स होण्याची कारणं-

  1. आनुवंशिकता- अनेक फ्रायब्रोइड्स आनुवंशिक (Genetic) घटकांमुळे होतात
  2. हार्मोन- फायब्रोईडममध्ये महिलांच्या शरीरातून निघणाऱ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन होर्मोनचं प्रमाण गर्भाशयातील स्नायूंपेक्षा जास्त असतं. स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid  

फायब्रॉईड्सची तपासणी कशी करतात?

योनीमार्गाची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर फायब्रॉईड्सची माहिती मिळते. काही वेळा सोनोग्राफी करून याची तपासणी करावी लागते. स्त्रीरोगतज्ज्ञ फायब्रॉईड्सच्या तपासणीच्या तीन पर्यायांची माहिती देतात.

सोनोग्राफी - याच्या मदतीने फायब्रॉईड्स कुठे आहेत आणि किती आहेत हे तपासण्यात येतं

MRI - फायब्रोइड्सचा (गाठी) आकार आणि त्यांची जागा तपासली जाते

हिस्टरेस्कोपी - यात वैद्यकीय तज्ज्ञ गर्भाशयाच्या मुखातून टेलिस्कोप गर्भाशयात नेतात. गर्भाशयाची तपासणी केली जाते.

फायब्रॉईड्सवर उपाय काय?

महिलेच्या शरीरात फायब्रॉईड्सची संख्या जास्त असेल, आकार मोठा असेल किंवा यामुळे पाळीचा त्रास होत असेल तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार शस्त्रक्रियाकरून गाठी काढाव्या लागतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार यात मायमेक्टॉमी आणि हेस्टरेक्टॉमी या दोन प्रमुख शस्त्रक्रिया आहेत.

मायमेक्टॉमी - महिलेला भविष्यात मूल व्हावं अशी इच्छा असेल तर गर्भाशय आणि गर्भाशयाच्या भिंतींवरील गाठी काढून गर्भाशय तसंच ठेवलं जातं. पण ही शस्त्रक्रिया प्रत्येकवेळी शक्य असतेच असं नाही.

हेस्टरेक्टॉमी - फायब्रोइडसाठी ही सामान्यत: केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. यात महिलेचं गर्भाशय काढून टाकण्यात येतं.

तज्ज्ञ म्हणतात, की वयाची पस्तिशी ओलांडलेल्या माहिलेला फायब्रॉईड्सचा त्रास होत असेल तर गर्भाशय काढून टाकणं योग्य ठरतं आणि महिला 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर गर्भाशयासोबत काहीवेळा स्त्रीबीजकोषही काढून टाकण्यात येतो. "स्रीयांना गर्भाशयातील गाठी होण्याची कारणे व उपाय | Uterine Fibroid"

गाठ खूप मोठी झाल्यास अतिरक्तस्राव होऊन जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. गाठीचा दबाव मूत्राशय, मूत्रवाहिनीवर पडून लघवीला त्रास होऊ शकतो. काहीवेळा गाठीचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं."


माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या