कंबरदुखी | Kambardukhi | Backache

 कंबरदुखी | Kambardukhi | Backache 

कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. 

एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. सुरुवातीला या वेदना अतिशय कमी असतात आणि त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. पण जस जसा काळ लोटतो आणि आपण यावर काहीच उपाय करत नाही तेव्हा या वेदना अतिशय वाढतात.

कंबरदुखी | Kambardukhi | Backache
कंबरदुखी | Kambardukhi | Backache 

कंबरदुखीची मुख्य कारणे

कंबरदुखीची काही मुख्य कारणे आपण पाहून घेऊया. जर हे करणे तुम्ही थांबवले तर त्याचा सुद्धा फायदा दिसू शकतो, अतिशय मऊ गादीवर झोपणे, जास्त काळ हाई हिल परिधान करणे, जास्त वजन वाढणे, शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणे, तासनतास एकाच जागेवर बसणे, शारीरिक हालचाल जास्त न करणे, व्यायाम करायला टाळाटाळ करणे, योग्य स्थितीमध्ये बसणे, यांसारख्या काही गोष्टी मुख्यत: कंबरदुखीला कारणीभूत असतात. त्यामुळे उपचारासोबत या गोष्टी करणे सुद्धा थांबवावे. 'कंबरदुखी | Kambardukhi | Backache'

कंबरदुखीवर घरगुती उपचार

एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. 

लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की मालीश करण्याआधी किमान ३० मिनिटांनीच अंघोळ करावी. जेणेकरून या वेळेत तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल.कंबरदुखी | Kambardukhi | Backache 

कपड्याने द्या शेक

जेव्हा कंबर खूप दुखत असेल आणि कोणी मसाज करणारा सुद्धा नसेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून त्यातून निघणाऱ्या वाफेने कंबरेला शेक द्या. 

एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या अंगावर प्युअर कॉटनचे कपडे असतील. सोबत या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या की शेक कधीच थेट त्वचेवर देत नाही तुमच्या त्वचेवर कॉटन कपड्याचा एक थर असावा.

कामातून ब्रेक घ्या

जर तुम्ही तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कामातून तुम्ही दर तासाने एक ब्रेक घ्या आणि ५-१० मिनिटे फेरी मारा. तुमच्या शरीराची हालचाल ठराविक काही काळाने व्हायला हवी. 

असे केल्यास कंबरेवर दाब पडत नाही आणि कंबरेला आराम मिळत राहतो.

तुम्ही घरी असाल की ऑफिसला ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका. ही गोष्ट तुम्ही करत नसाल तर कंबरदुखीचा त्रास तुम्हाला विळखा नक्कीच घालणार. त्यापासुन स्वत:चा बचाव करायचा असेल तर आवर्जून कामातून ब्रेक घेत राहा.

कॅल्शियम डायट

स्त्रियांच्या शरीरात वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची ४५ वर्षे ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या शरीरात शक्य तितका कॅल्शियमचा वापर करावा. 

कॅल्शियम तुमची कंबरदुखी दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, पण हेच कॅल्शियम जर कमी झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. ते शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घ्यावीत.

तर असे काही उपाय करून तुम्ही सहज आपल्या कंबरदुखीवर नियंत्रण मिळवू शकता. ही गोष्टी आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांना देखील कंबरदुखीपासून दूर राहण्याचा सल्ला द्या.

कंबरदुखीवर घरगुती उपाय 

1. आलं –

कंबरदुखीमध्ये आल्याचा उपयोग औषधाप्रमाणे केला जातो.

दुखऱ्या भागावर आल्याची वाटून केलेली पेस्ट लावण्याने बराच फरक पडतो.

तसेच ताज्या आल्याचे ४,५ तुकडे दीड कप गरम पाण्यात उकळून नंतर ते पाणी गार करून प्यावे. किंवा आले, काळी मिरी आणि लवंग घालून उकळलेला हर्बल चहा घ्यावा.

आल्यामध्ये असणाऱ्या अँटी इंफ्लेमेट्री तत्वांमुळे कंबरदुखीच्या वेदना कमी होतात.

2. तुळस – 
एक कप पाण्यात तुळशीची ८, १० पाने उकळून ते पाणी गार करून दररोज प्यावे. ह्यामुळे कंबरदुखी कमी होण्यास निश्चित मदत होते.

3.खसखस – 
खसखस ही कंबरदुखीवर अत्यंत गुणकारी आहे. दूध आणि पिठीसाखर घालून केलेली खसखशीची खीर पिणे हा कंबरदुखीवरचा रामबाण उपाय आहे.

4. लसूण –
रोज सकाळी रिकाम्यापोटी लसणाच्या ४, ५ पाकळ्या खाण्यामुळे फक्त कंबरच नाही तर शरीराच्या इतरही भागांना खूप उपयोग होतो.

तसेच नारळाच्या तेलात थोड्या लसूण पाकळ्या घालून ते तेल गरम करून दुखऱ्या भागावर त्या तेलाने मसाज केला की बराच आराम मिळतो.

5. बर्फाने शेकणे – 
बर्फाचे खडे एका रबरी पिशवीत घालून त्याने दुखऱ्या भागावर शकणे लाभदायक ठरू शकते. दर दोन तासांनी हा उपाय करावा.जर सूज आली नसेल तरच हा उपाय करावा.

6. हर्बल ऑइल – घरी केलेले अथवा तयार मिळणाऱ्या हर्बल तेलाने कमरेची मालीश केली असता बराच आराम मिळतो.

7. वाफ घेणे - 
कमरेच्या दुखऱ्या भागावर वाफेने शेक घेणे हा देखील आयुर्वेदात सांगितलेला प्रभावी उपाय आहे.

गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून दुखऱ्या भागावर ठेवावा. ही क्रिया पुनःपुन्हा करावी. ह्यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होऊन रक्ताभिसरण सुधारते व दुखणे कमी होते.

8. दूध –
दूध हे कॅल्शियम चे प्रमुख स्त्रोत आहे. आणि कॅल्शियम मुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे नियमित दूध पिणे हे पाठ, कंबर दुखण्यावर उत्तम औषध आहे.

योगासने - 
तज्ञांच्या सहाय्याने योग्य पद्धतीने शिकून नियमित स्वरूपात योगासने करण्याचा कंबरदुखीवर खूप उपयोग होतो. ती आसने खालीलप्रमाणे

1. शलभासन
2. मकरासन
3. धनुरासन
4. भुजंगासन
5. मर्कटासन

हे उपाय करूनही ६ आठवड्यांपर्यंत कंबरदुखी बरी झाली नाही तर  डॉ. बाबासाहेब रेणुशे ना अवश्य भेटा. दुखणे अंगावर काढू नका. आयुर्वेदिक उपचारांनी कंबरदुखी पुर्णपणे बंद होते. "कंबरदुखी | Kambardukhi | Backache" 

माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760


The Adventures of Lily and Max Bedtime Stories for Kids


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या