30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor

 30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor     

Bone Health : वयाच्या 30शी नंतर हाडे बनतात कमजोर व ठिसूळ, तुटू नयेत म्हणून खायला सुरूवात करा ‘हे’ पदार्थ!

30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor

30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor
30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor     

आपल्या शरीराचा आणि अंतर्गत गोष्टींचा विकास काही काळासाठीच होतो. यापैकीच एक हाडे आहेत. जेव्हा आपण वयाच्या 20 आणि 30शी मध्ये असतो तेव्हा आपली हाडे सर्वात जास्त द्रव्यमानाला हिट करतात. 

म्हणजेच आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम जमा होण्याची प्रक्रिया अगदी लहानपणापासून सुरू होते आणि ती वयाच्या 30शी पर्यंत चालूच राहते. पण वयाच्या 30शी नंतर मात्र हे घडणे थांबते आणि हाडे कमकुवत होऊ लागतात किंवा त्यांचे वस्तुमान गमावू लागतात. '30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor'     

त्यामुळे पडल्यावर हाडे तुटण्याचा किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य अन्नपदार्थ निवडणे खूप महत्वाचे असते.

हे डाएट हाडे बनवते मजबूत

हाडे मजबूत होण्यासाठी सर्वाधिक कॅल्शियमची आवश्यकता असते आणि ते तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांमधून मिळू शकते हे तुम्ही ऐकलेच असेल. 

पण द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील एका संशोधनात असे आढळून आले आहे की कॅल्शियमसाठी सर्वोत्तम उत्पादनांमध्ये भाज्या किंवा प्लांट-बेस्ड फूड देखील समाविष्ट आहेत. 

या संशोधनात सुमारे 102 वयस्कर व्यक्तींना घेण्यात आले होते, जे कमी प्रमाणात भाज्या खातात. हे संशोधन सुमारे 8 आठवडे चालले. निम्म्या सहभागींना प्रति व्यक्ती 270 ग्रॅम अतिरिक्त भाजीपाला देण्यात आला आणि बाकीच्यांना त्यांच्या त्याच आहारावर ठेवण्यात आले. 30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor     

अभ्यासा अंती विषेतज्ञांना असे आढळून आले की ज्या गटाला जास्त भाज्या दिल्या गेल्या त्यांची हाडे पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले.

हाडे मजबूत व हेल्दी ठेवणारी सामग्री

बोन हेल्थ अँड ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या मते, भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि हे तत्व हाडे मजबूत व निरोगी ठेवण्याचे काम करतात. 

अशा परिस्थितीत हाडांची मजबुती टिकवून ठेवण्यासाठी या भाज्यांचे सेवन करू शकता, ज्या खाली दिल्या आहेत.

कोणती फळे व भाज्या हाडांसाठी चांगल्या असतात?

हिरव्या भाज्या -  कोबी, शिमला मिरची,  टोमॅटो 

भोपळ्याच्या बिया

सोयाबीन

दुग्ध उत्पादने

फळ - संत्री, पेरू आणि स्ट्रॉबेरी , केळी

अंडी

ओमेगा -3 फॅटी ऍसिड

रताळे

हाडांसाठी फक्त कॅल्शियमच गरजेचे असते का?

हाडे मजबूत करण्यासाठी शरीरासाठी कॅल्शियम सर्वात महत्वाचे आहे. शरीरातील 99% कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये असते आणि ते गमावणे अजिबात योग्य नाही. पण याशिवाय असे अनेक पोषक तत्वे आहेत जी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

व्हिटॅमिन डी (Vitamin D) 

व्हिटॅमिन डी मधून हाडांचे टिश्यूस तयार होतात किंवा त्यांची नव्याने निर्मिती होते. तसेच यामुळेच शरीर कॅल्शियम अगदी सहज शोषून घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

व्हिटॅमिन के (Vitamin K) 

व्हिटॅमिन के फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसच्या जोखमीपासून आपल्या हाडांचे संरक्षण करण्यासाठी मदत करते. 

पोटॅशियम (Dietary potassium)

पोटॅशियम कॅल्शियमची पातळी कमी होण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील अॅसिड लोड तटस्थ करते. 

व्हिटॅमिन सी (Vitamin C )

व्हिटॅमिन सी द्वारे आपल्या शरीरात कोलेजन तयार होते, जे त्वचा आणि हाडे निरोगी ठेवते. 

मॅग्नेशियम (Magnesium) 

मॅग्नेशियमद्वारे हाडांची घनता चांगली राहते आणि ते फ्रॅक्चरच्या स्थितीपासून आपल्या हाडांचे संरक्षण करते. 

हे सर्व पोषक तत्व आणि जीवनसत्त्वे (Vitamins) तुमच्या हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी जबाबदार असतात.

टोफू व दही

टोफू हे एक सोया उत्पादन आहे, ज्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात.

तसंच योगर्ट किंवा दही देखील आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असते. त्यात प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक असतात जे आपली हाडे मजबूत करण्यासाठी आणि ऑस्टियोपोरोसिसपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात.

दही आणि योगर्ट

आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकाच पदार्थाची दोन वेगेवगेळी नावं. पण हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत, काही वर्षांपुर्वीपर्यंत योगर्ट हा प्रकार तितकाचा प्रचलित नव्हता. 

घराघरात रात्री विरजण लावलं जायचं, कारण प्रत्येकाला ताटात थंडगार, मधुर दही वाढणं अनिवार्य होतं, असे म्हणतात, की भारतीयांचं जेवण दह्याशिवाय पुर्ण होत नाही, किंबहुना जेवणातला सर्वात महत्वाचा, पौष्टिक घटक म्हणून दह्याचा विचार केला जातो.

दही भात, रायतं, कोशिंबीर, दही बुंदी यांसारख्या अनेक प्रकार करून दह्याची चव चाखली जाते.

योगर्ट म्हणजेच दही, तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही हे वाचायलाच हव. कारण यामुळे तुमचा एक गैरसमज आज नक्कीच दूर होईल.

योगर्ट आणि दही हे दोन्ही डेअरी प्रोडक्ट आहेत, म्हणजेच ते दुधाने बनतात. त्यांची चवही जवळजवळ सारखीच असते. जास्तीतजास्त लोकांना ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असच वाटत असतं. 

पण असं मुळीच नाही, हे दोन्ही पदार्थ वेगळे आहेत.

दही म्हणजेच Curd आणि योगर्ट म्हणजेच Yogurt हे डेअरी प्रोडक्टचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हे दोन्ही दुधात वेगवेगळ्या प्रकारे यीस्ट बनवून तयार केले जातात.

योगर्ट दुधापासून बनलेले एक असे प्रोडक्ट आहे, जे बनवण्यासाठी दुधात बॅक्टेरियाच्या मदतीने यीस्ट तयार केले जाते. ह्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅक्टेरियाला योगर्ट कल्चर म्हणतात. 

जेव्हा हा बॅक्टेरिया तापवलेल्या आणि पाश्चराईज केलेल्या दुधात टाकला जातो, तेव्हा काही काळाने दुधातील लॅक्टोज आंबण्यास सुरुवात होते आणि लॅक्टिक ॲसीड तयार होते. 

लॅक्टिक ॲसीडमुळे दुध घट्ट होते आणि त्याला योगर्टची विशिष्ट चव येते. हे तयार झालेले योगर्ट त्यानंतर थंड केले जाते आणि त्यात आवडीनुसार स्वाद घातले जातात. 

त्यालाच आपण फ्लेवर्ड योगर्ट म्हणतो. हे तयार झालेले योगर्ट व्यवस्थित पकिंग करून विकण्यासाठी पाठवले जाते. बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरचे योगर्ट सहज उपलब्ध असतात.

दुसरीकडे दही बनविण्यासाठी दुधात खाण्यात वापरणारे ॲसीडीक सबस्टन्स जसे की, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळण्यात येते. दही हे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. 

ह्यासाठी थोडसं दही गरम दुधात मिसळवून त्याला ३-४ तासांकरिता ठेवून द्या. लॅक्टिक ॲसिड बनविणाऱ्या 'योगर्ट कल्चर' ह्या बॅक्टेरियामुळे योगर्टला आंबटगोड चव येते, तर दह्यात योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. पण दह्यात योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.

योगर्ट हा शब्द एक तुर्की शब्द 'yogurt' वरून घेण्यात आला आहे. इंग्रजीत योगर्टला वेगवगळ्या प्रकारे लिहिले जाते. जसे की yogurt, yoghourt. "30शी नंतर हाडे बनतात कमजोर | 30 Shi Nantar Hade Babnatat Kamajor"    

योगर्ट हे कॅलशियम, रायबोफ्लेविन-विटॅमिन B2, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, आयोडिन, विटॅमिन B-12 आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ह्याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760


The Adventures of Lily and Max Bedtime Stories for Kids




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या