वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या प्रश्नांची उत्तरे Vata rog samj gairsamaj janun ghya prashnanchi uttare
नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण वात रोगा विषयी व त्याच्या विषयी असलेल्या गैरसमजांविषयी माहिती करून घेणार आहोत . प्रामुख्याने शरीरामध्ये 80 प्रकारचे वात रोग असतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेले 80 प्रकारचे वात व त्यामध्ये असणारे गैरसमज याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला, आजचा आपला विषय आहे वात रोग समज गैरसमज.
Vata rog samj gairsamaj janun ghya prashnanchi uttare
१. वातरोग हा वृद्धांना होणारा आजार आहे?
वातरोग कुठल्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. विविध प्रकारचे वातरोग वेगवेगळ्या वयात होऊ शकतात. उदा. लहान मुलांना जेआयए (जुवेनाइल इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस), जेडीएम (जुवेनाइल डर्मेटो मायोसायटिस) सारखे वातरोग, तरुण व प्रौढ वयात संधिवात व अॅन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस आणि ज्येष्ठांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस व गाऊटसारखे वातरोग आढळून येतात.
२. वातरोग केवळ दोन-तीन प्रकारचे आहेत?
वातरोगाचे २-३ प्रकारच आहेत, असा समज लोकांमध्ये आहे. मात्र, आधुनिक वातरोगशास्त्रानुसार शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. त्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, एंकिलोसिंग स्पॉन्डिलायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस, गाऊट, ऑस्टिओआर्थरायटिस, चिकनगुनिया आर्थरायटिस, एस.एल.ई.(ल्युपस), शोग्रेन सिन्ड्रोम सारख्या वातरोगांचा समावेश आहे.'Vata rog samj gairsamaj janun ghya prashnanchi uttare'
३. संधिवातावर उपचार नाही?
संधिवातावर उपचार नाही, आणि उपचार करून देखील व्यंग उत्पन्न होतेच; असा एक गैरसमज वातरोगाबद्दल आहे. आधुनिक औषधांच्या सहाय्याने वातरोगावर उपचार होतो आणि व्यंग उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते. त्याच प्रकारे वातरोगग्रस्त रुग्णांना सामान्य जीवन देखील जगता येते.
Vata rog samj gairsamaj
४. वातरोग केवळ जीवनशैलीतील बदलाने कमी होतो?
वातरोग झाल्यावर नातेवाईक अथवा मित्र सल्ला देतात की, वजन कमी केल्याने, व्यायाम केल्याने वातरोग बरा होईल. अर्थात हे उपचारास पुरक असले तरी वातरोग एक प्रकारचा आजार असल्यामुळे औषधोपचार करणे आवश्यक असते. औषधोपचारांसह जीवनशैलीत बदल केला तरच फायदा होईल, केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसा नाही.Vata rog samj gairsamaj janun ghya prashnanchi uttare
५. वातरोग हा केवळ सांध्यांच्या वेदनेपुरता मर्यादित आहे?
असा एक गैरसमज समाजात आहे. त्यामुळे अनेक जण या वेदना अंगावर काढतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, संधिवात शरीरातील सगळ्या अवयवांवरती प्रादुर्भाव करू शकतो आणि त्यामुळे अन्य अवयवांना देखील हानी पोहचू शकते. उदा. वातारोगांमध्ये डोळ्यात कोरडेपणा, फुप्फुसांना इजा होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
६. रक्ततपासणी आणि एक्स-रे द्वारे वाताचे रोगनिदान होते?
आरए फॅक्टर आणि एक्स-रे तपासण्या मुख्यत्वेकरून केल्या जात असल्या तरी केवळ यामुळेच प्रत्येकवेळा वातरोगाचे निदान शक्य नाही. वातरोगाचे निदान शारीरिक तपासणी आणि वातरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या चाचण्यांच्या आधार घेऊन केल्या जाते. केवळ रक्ततपासणी व एक्स-रे वर अवलंबून राहता येत नाही; कारण चाचण्यांच्या काही मर्यादा असतात.
Vata rog ani samasya
७. वातरोगावर औषधोपचार सुरू केले की, रुग्णाला लगेच फायदा होतो?
असा एक गैरसमज जनमानसात आहे. अर्थात रुग्णांना वाटत असते की, आपल्याला तातडीने फायदा व्हावा. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रात वातरोगांवर उपचारांसाठी जी औषधे वापरली जातात, ती रोगाच्या मुळाशी काम करीत असतात. त्यामुळे औषधांचा प्रभाव सुरू होण्यास तीन ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो, तर बारा आठवड्यांमध्ये फायदा दिसू लागतो. त्यामुळे धीर धरणे फार महत्त्वाचे आहे.
गैरसमज
९. औषधोपचारांचे दुष्परिणाम असतात
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आजाराच्या तुलनेत औषधांचे फायदे जास्त आहेत. फार कमी रुग्णांमध्ये याचे दुष्परिणाम आढळून येतात. औषधाचा डोस बदलल्याने दुष्परिणाम कमी होतात. सोबतच वातरोगतज्ज्ञ रक्ततपासणी करून दुष्परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेत असतात.
१०. वातरोगात फक्त स्टेरॉइडचाच वापर करण्यात येतो हा एक गैरसमज आहे
आधुनिक वातरोगशास्त्रात स्टेरॉइडसारख्या औषधांचा वापर अत्यल्प प्रमाणात करण्यात येतो. जर वातरोगांमुळे अन्य अवयवांवर परिणाम होत असेल, तर अशा परिस्थितीत स्टेरॉइड देण्याची आवश्यकता भासते. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, औषधांना घाबरण्याची गरज नाही. वातरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात औषध घेतले तर ते फायदेशीरच ठरते.
११. औषधोपचाराची गरज नाही...!
लोकांना असे वाटते की, वातरोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचारांची आवश्यकता नाही. मात्र, आधुनिक अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, वातरोगांचा लवकरात लवकर उपचार करवून घेतला, तर सांध्यांना कमीत कमी इजा होते. शिवाय औषधोपचार लवकरात लवकर बंद करण्याची शक्यता देखील वाढते.
१२.बरे वाटले की औषध बंद केले तरी चालतील...!
आराम पडल्यावर रुग्ण जेवढ्या कालावधीची औषधे दिलीत, तेवढी औषधे घेऊन औषधोपचार बंद करतात. वाताचे औषध मुळापासून काम करते. त्यामुळे आराम पडला असे वाटले तरी स्वतःच्या मनाने औषधोपचार बंद करायचा नसतो. बरे वाटू लागले की, "Vata rog samj gairsamaj janun ghya prashnanchi uttare" डॉक्टर तपासण्या करूनच औषधे कमी करतात.
माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा
आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
ओ.पी.डी वेळ :
प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी ,
सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.
Blog
https://drbabasahebrenushe.blogspot.com/
Quora
https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/
व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts
https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1
Google - https://g.co/kgs/GcvzaB
https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2
Linktree -
https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe
AI -
https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760


0 टिप्पण्या
ही प्रायव्हेट वेबसाईट असून. डॉ. बाबासाहेब रेणुशे सरांचे मार्गदर्शन व आरोग्य विषयक सल्ले या वेबसाईट वरती पाहायला मिळतील.