अश्वगंधा चे फायदे व नुकसान | Ashwagandha che fayade v nuksan
आजच्या आपल्या आरोग्यविश्व ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत अश्वगंधा या वनस्पती विषयीची माहिती.
अनेक मंडळींना अश्वगंधा ही वनस्पती रसायन, टॉनिक, बलवर्धक, स्टॅमिनावर्धक आहे असे माहीत असल्यामुळे, ती केव्हाही कधीही कसेही तिचे सेवन करतात. परंतु तिचे साईड इफेक्ट देखील आहेत. हे अनेक जणांना माहीत नसल्यामुळे त्यांची पंचायत होऊ शकते. त्यासाठीच या वनस्पतीचे फायदे व नुकसान हे जाणून घेऊनच तिथे सेवन करावे किंवा काही समजत नसेल तर आपल्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तिचे सेवन करावे.
अश्वगंधा एक गुणकारी औषधी आयुर्वेदिक(Ayurvedic) वनस्पती आहे यामुळे ही खुप उपयोगी आहे. अश्वगंधामुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत होते, पण याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
![]() |
| अश्वगंधा चे फायदे व नुकसान |
अश्वगंधा चे फायदे व नुकसान | Ashwagandha che fayade v nuksan
जर याचा जास्त प्रमाणात वापर केलात तर नुकसानदायक ठरू शकते. अश्वगंधा एक बलवर्धक रसायन मानले जाते. प्राचीन काळापासून आत्तापर्यंत अनेक विद्वानांनी या वनस्पतीची एक गुणकारी औषध म्हणून प्रशंसा केली आहे.
प्राचीन काळापासून याला एक शरीरातील शक्तिवर्धक परम पौष्टिक व सर्वांग शक्ती देणारा, क्षय रोगनाशक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा, वृधावस्थेला जास्त काळासाठी दूर ठेवणारा सर्व्वोत्तम वन औषधी मानले जाते. हे खोकला, खाज, व्रण, आमवात इत्यादी नाशक आहे. 'अश्वगंधा चे फायदे व नुकसान | Ashwagandha che fayade v nuksan' अश्वगंधाचे सर्वात जास्त रसायने त्याच्या मुळांमध्ये आढळते. बऱ्याच ठिकाणी अश्वगंधाची शेती केली जाते. अश्वगंधा ची मुळी जवळ जवळ ६००० रु प्रती क्विंटल तसेच याच्या बिया ५० रु. प्रती किलो या किमतीने विकल्या जातात.
याची उंची १७० सेंटीमीटर असते. हा टोमॉटो सारखा लाल रंगाचा दिसायला असतो, याचा वापर वीर्य व पुरुष सामर्थ्य वाढवण्यासाठी होतो. शरीरावर मासं वाढवण्यासाठी, स्तनांमध्ये दुध वाढवण्यासाठी, तसेच गर्भधारण च्या रुपात प्रयोग केला जातो.
अश्वगंधा(Ashwagandha) चे सेवन केल्याने प्रजननात वाढ होते, यामुळे शुक्राणुची संख्या वाढते (Sperm Count) आणि वीर्य पण चांगल्या मात्रेत बनते. अश्वगंधा चे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा संचारित होते, आळस पणा जातो आणि ज्यांना संभोग करता वेळी थकाल्या सारखे वाटते त्यांना अश्वगंधा च्या सेवनाचे फायदे होतात. हे शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढवते. अश्वगंधा ची पाने व याचे मूळ (Ashwagandha Root) उकळून चहा बनवला जातो, जे आरोग्यासाठी लाभदायक असते. अजून हि अश्वगंधा चे फायदे आहेत. अश्वगंधा ची पाने त्वचा रोगावर लाभदायक असतात. यामुळे शरीरावरील सूज कमी होते, शरीरावरील घाव तसेच जखम अश्वगंधाच्या वापरण्याने लवकर बरी होते.
अश्वगंधाचे चूर्ण
अश्वगंधाचे चूर्ण कोणत्याही तेलात मिसळवून ते शरीरावर लावल्याने चर्मरोग होत नाही. अजून अनेक रोग बरे करण्यासाठी अश्वगंधा चा वापर केला जातो.
अश्वगंधा चे चूर्ण (Ashwagandha powder) दुधात मिसळवून त्याचे सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो, अश्वगंधा चे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि याच्या सेवनाने आपली स्मरणशक्ती वाढते,
यामुळे आपल्याला डोकेदुखी व अर्धशिशी(Migraine) सारखे आजार होत नाहीत. याच्या सेवनाने शरीर मजबूत होते, आपली हाड मजबूत होतात. अश्वगंधा चा औषध म्हणून वापर अनेक वर्षान पासून होत आहे. अश्वगंधा चे फायदे व नुकसान | Ashwagandha che fayade v nuksan याच्या सेवनाने उंची वाढण्यास मदत होते, अश्वगंधा(Ashwagandha) च्या सेवनाने कर्करोग (Cancer) सारख्या आजारांचा धोका कमी होतो. याच्या सेवनाने आपले मन शांत राहते, जे लोक संभोग करताना लवकर थकतात त्याच्या साठी खूप प्रभावशाली औषध आहे.
आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतो, अश्वगंधा मध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स आणि विट्यांमिंसमुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. अश्वगंधा च्या सेवनाने ६९% झोप न येण्याची समस्या आणि ताण तणाव या सारख्या समस्या दूर होतात.
अश्वगंधा च्या सेवनाचे फायदे
अश्वगंधा टेस्टोस्टेरोन लेवल(Testosterone level) वाढवते, तसेच वीर्य(Sperm) ची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.
परंतु अश्वगंधा जास्त प्रमाणात खाल्याने याचे नुकसान देखील होतात. जास्त सेवन केल्याने झोप येऊ लागते, आपण आळशी होतो, अश्वगंधा च्या जास्त सेवनाने आपल्याला इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते उदा. पोटा संबंधी, डोक्या संबंधी, शरीरा संबंधी समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते.
अश्वगंधा च्या जास्त सेवनाने पोटाचे रोग, आपले शरीर कमजोर होते, गर्भवती महिलांनी याचे जास्त सेवन केल्याने त्यांना हे नुकसानदायक ठरते. "अश्वगंधा चे फायदे व नुकसान | Ashwagandha che fayade v nuksan"
डॉक्टरही सल्ला देतात कि अश्वगंधा वापर ठराविक वेळे पर्यंत केला पाहिजे तसेच योग्य सल्ला घेऊन याचा वापर केला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब रेणुशे. M.D (Ayu) प्रज्ञा क्लिनिक, कोकण नगर, रत्नागिरी 7057394036.
माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा
आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
ओ.पी.डी वेळ :
प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी ,
सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.
Blog
https://drbabasahebrenushe.blogspot.com/
Quora
https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/
व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts
https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1
Google - https://g.co/kgs/GcvzaB
https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2
Linktree -
https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe
AI -
https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760

1 टिप्पण्या
नमस्कार सर, मला मानसिक आजार आहे. गेल्या 10वर्षांपासून मी आलोपाटीक गोळ्या खात आहे. तरी काही फरक नाही, झोपेच्या सम्शा आहेत, कोणतेही काम करू वाटत नाही,आणि मी गेल्या 8ते 10वर्षांपासून काहीच काम केल नाही, फक्त नैराश्य चा विचार, आणि आता काम करायची इच्छा होत नाही, भीती वाटते, जबाबदारी नको वाटते, नकारात्मक विचार जास्त आहेत, आत्मविश्वास कमी, घरची परिस्थिती खूपच खराब आहे, माझी आई आणि बायको सर्व जबाबदारी घेतात,मी आणि माझे वडील काहीच काम करत नाही, वडील सुद्धा माझ्यासारखे मानसिक आजाराने त्रासलेलं आहेत, मला लहान दोन मुलं आहेत, तरी मला यातून बाहेर पडायचं आहे, माझे वय 38आहे, मी सातारा चा आहे. मला योग्य मार्गदर्शन करावे,नमस्कार सर.
उत्तर द्याहटवाही प्रायव्हेट वेबसाईट असून. डॉ. बाबासाहेब रेणुशे सरांचे मार्गदर्शन व आरोग्य विषयक सल्ले या वेबसाईट वरती पाहायला मिळतील.